Sun, Sep 23, 2018 04:02होमपेज › Satara › साताऱ्यात काँग्रेसचा विश्वासघात दिन

साताऱ्यात काँग्रेसचा विश्वासघात दिन

Published On: May 28 2018 2:25PM | Last Updated: May 28 2018 2:25PMसातारा : प्रतिनिधी

नरेंद्र मोदी सरकारला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षात मोदी सरकारने कोणत्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. नागरिकांना दिलेली आश्वासने पाळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी मोदी सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.

सोमवारी दुपारी काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. बेरोजगारी, इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनतेची वाट लागली आहे असे फलक घेऊन निषेध करण्यात आला. सरकारने जनतेचा आणि महिलांचा विश्वासघात केला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.