Sun, Oct 20, 2019 21:56होमपेज › Satara › प्रतापगडावर नवरात्रौत्सवास प्रारंभ

प्रतापगडावर नवरात्रौत्सवास प्रारंभ

Published On: Sep 29 2019 1:38AM | Last Updated: Sep 29 2019 1:38AM
प्रतापगड : वार्ताहर

अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अष्ठभुजा श्री आई भवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सकाळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते घटस्थापना करुन नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. किल्‍ले प्रतापगडावर श्री भवानी मातेच्या प्रतिष्ठापणेला ह्या वर्षी 359 वर्ष पूर्ण होत असून यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उत्सवाचे आयोजन 

राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. किल्‍ले प्रतापगडावर दोन घट बसवण्याची परंपरा आहे. नवरात्रात नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा तसेच गोंधळ होत असतो. नऊ दिवस पुराणांचे पाठ केले जातात. चौथ्या माळेला संध्याकाळी मशाल महोत्सव तर पाचव्या माळेला पालखी सोहळा होतो. आठव्या माळेला अष्ठमीनिमित्त घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार असून नवमीला  नवचंडी यज्ञ केला जातो.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पालखी मिरवणूक काढून नवरात्र उत्सवाची सांगता होते. या उत्सव काळात राज्यभरातून लाखो भाविक प्रतापगडावर येतात. त्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यानिमित्त मंदिर परिसरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवाला कोकण विभागातुन मोठ्या संख्येने भाविक येतात त्यांच्या साठी एसटी महामंडळाचा विशेषतः गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.