Tue, Mar 26, 2019 12:13होमपेज › Satara › सातारा : फलटणमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून

सातारा : फलटणमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून

Published On: Dec 03 2017 11:56AM | Last Updated: Dec 03 2017 11:56AM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

नाईकबोमवाडी ते तातमगिरी रस्त्यावर पंचवीस वर्षीय युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला आहे. खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. 

नाईकबोमवाडी-तातमगिरी रस्त्यावर एका पंचवीस वर्षीय युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला आहे. त्याला अज्ञाताने चारचाकी गाडीतून आणून रस्त्यापासून सुमारे ३० फूट फरफटत घेऊन जाऊन या युवकाला फेकण्यात आले आहे. मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून अधिक तपास सुरू आहे.