Tue, Apr 23, 2019 13:50होमपेज › Satara › पालिकेतील तो खून दारूच्या कारणातून

पालिकेतील तो खून दारूच्या कारणातून

Published On: Mar 11 2018 7:30PM | Last Updated: Mar 11 2018 7:17PMसातारा : प्रतिनिधी 

सातारा नगरपालिकेच्या इमारतीखाली असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरात शनिवारी मध्यरात्री राजेंद्र बबन सुर्यवंशी (वय 45, रा. घोरपडे कॉलनी, केसकरपेठ सातारा) यांचा त्याच पेठेत राहणार्‍या बाबू भोसले याने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला होता. 

या खुनाच्या घटनेने परिसरासह शहरात खळबळ उडाली होती. या खुनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 9 तासांत या खुनाचा पर्दाफाश केला. दारू आणि जुन्या वादाच्या कारणातून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.