Fri, Apr 26, 2019 19:37होमपेज › Satara › महावितरणचा मीटर वितरणात महाघोटाळा

महावितरणचा मीटर वितरणात महाघोटाळा

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 11:03PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात मीटरची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असतानाच महावितरणकडून विभागीय कार्यालयांना दिलेल्या मीटरमध्ये महाघोटाळा झाला आहे. या प्रकरणात सातारारोड (ता. कोरेगाव) वेअर हाऊसची चौकशी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. विभागीय कार्यालयांमध्येही वितरित केलेल्या मीटरचा हिशेब जुळत नसल्याने विभागांमध्ये काम करणारे अभियंते धास्तावले आहेत.

जिल्ह्यात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महावितरणच्या कार्यालयावर मोर्चे काढले असताना जिल्ह्यातील सर्व आमदारांनी नागपूर अधिवेशनात सातार्‍यावर होणार्‍या अन्यायाचा जाब राज्यकर्त्यांना विचारायला हवा, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. जिल्ह्यात लोडशेडिंगचे प्रमाण वाढवलेले असतानाच वीजपुरवठा अनियमित केला जात आहे.  महावितरणचे निकृष्ट मीटर सध्या चर्चेत आले आहेत. कनेक्शन द्यायच्या अगोदरच बिलाची आकारणी करणारे प्रकार घडले आहेत. मीटरमधून जंप होणार्‍या रीडिंगमुळे ग्राहक हैराण आहेत. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, याच मीटरमध्ये महावितरणकडून झालेला महाघोटाळा उघडकीस आला आहे.  दोन वर्षांपूर्वी महावितरणला मीटरचा प्रमाणावर पुरवठा करण्यात आला होता. या मीटरचे टप्प्याटप्प्याने वितरण होत असताना त्याचा हिशेब प्रत्येक कार्यालयात ठेवला जातो. महावितरणचे सातारारोड सब स्टेशन असून, वेअर हाऊस आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे डीपी, मीटरर्स, केबल व अन्य साहित्य ठेवले जाते. 
या ठिकाणी मागणीनुसार विभागीय कार्यालयांना साहित्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सध्या या वेअरहाऊसमधून शेकडो मीटर गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. वरिष्ठ कार्यालयाने या वेअर हाऊसला मीटर दिले. त्याची नोंद महावितरणच्या सिस्टीमलाही आहे. मात्र, हे मीटर खाली विभागीय कार्यालयांना मिळालेच नाही.