Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Satara › फलटण : मराठा समाजाचे मुंडन आंदोलन (Video)

फलटण : मराठा समाजाचे मुंडन आंदोलन (Video)

Published On: Jul 29 2018 12:14PM | Last Updated: Jul 29 2018 12:56PMफलटण : प्रतिनिधी

 मराठा आरक्षणासाठी गेली चार दिवस फलटण येथील अधिकार गृहासमोर मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी चौथ्या दिवशी  मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचे श्राद्ध घातले. या वेळी एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला.

बेमुदत ठिय्या आंदोलनातील कार्यकर्ते यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापाच अशा घोषणा देऊन गेली सतरा महिने झालं तरी हे सरकार मागासवर्गीय आयोगालाच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने अडमुठी भूमिका घेतल्यास आमचा आडमुठेपणा तुम्हाला परवडणारा नसेल असा इशारा दिला आहे.