Sun, Sep 23, 2018 06:24



होमपेज › Satara › विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

Published On: Dec 20 2017 5:30PM | Last Updated: Dec 20 2017 5:30PM

बुकमार्क करा





मारूल हवेली : वार्ताहर

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह बाळासाहेब पाटणकर ( विक्रमबाबा ) यांच्या विरूध्दचा अविश्वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाटणच्या राजकिय गोटात खळबळ उडाली असून, विक्रमबाबा यांच्या आगामी राजकिय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे वर्चस्व आहे. या बाजार समितीच्या सभापती पदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  विक्रमबाबा पाटणकर यांची वर्णी लागली होती. मात्र विक्रमबाबा हे सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामकाज करत असल्याने संचालकांमध्ये नाराजीचा सूर होता. बाजार समितीच्या 14 संचालकांनी त्यांच्या विरूध्द अविश्वास ठराव घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याकरिता  जिल्हा उपनिबंधक संस्थेकडे मागणी केली होती. त्यानुसार मल्हारपेठ येथिल बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात बुधवारी दुपारी 12.30  वाजण्याच्या सुमार ही विशेष सभा घेण्यात आली. 

यावेळी सभापती विक्रमबाबा पाटणकर, उपसभापती दादासो यादव, संचालक अरविंद जाधव, अधिक माने, सुहास माने, राजाराम मोरे, सुभाष पाटील, सौ. रेखा पाटील, शहाबाई यादव, शंकर संकपाळ, श्रीरंग मोहीते, अभिजीत जाधव, उत्तम जाधव, आनंदा डुबल, सिताराम मोरे, रामदास कदम, शरद राऊत व आनंदराव पवार यांची उपस्थिती होती. कमराबंद सुरू असलेल्या सभेत हा अविश्वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान मंध्यतरीच विक्रमबाबा पाटणकर हे सभा सोडून निघून गेले. सभेचे अध्यक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय पवार यांनी काम पाहीले.