Thu, Jul 18, 2019 04:56होमपेज › Satara › तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून

तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 10:54PMवाई/ओझर्डे : प्रतिनिधी

मांढरदेव घाटात अठ्ठावीस वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, हल्लेखोरांनी मृतदेह शंभर फूट फरफटत नेऊन एका खोल वगळीत फेकून दिला होता. गाढवेवाडीच्या ग्रामस्थांमुळे हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी पोलिसांना अद्याप कसलेही पुरावे हाती लागले नसल्याने आरोपीला शोधणे वाई पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मांढरदेव घाटाच्या पायथ्याला पश्‍चिमेला असलेल्या गाढवेवाडीतील गामस्थ रविवारी फुटलेल्या पाईपलाईनचा शोध घेत होते.  यावेळी मुख्य रस्त्यापासून  सुमारे 200 फूट अंतरावर एका वगळीत याबाबतची माहिती वाई पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व त्याच्या सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले.  पोलिसांनी आजुबाजूच्या परिसराची पहाणी केली असता शंभर फूट अंतरावर त्या युवतीचे रक्त सांडल्याचे आढळून आले. हल्लेखोरांनी गळा चिरून खून केल्यानंतर  तरुणीचा मृतदेह फरफटत नेऊन तो वगळीत टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अंदाजे 25 ते 28 वर्षे वयोगटातील या तरुणीच्या डाव्या हातावर मेहंदी काढण्यात आली असून, मनगटावर बान महंमद असं लिहिले आहे. तर करंगळीवरही मेहंदीने बानू लव्ह असं लिहिलं आहे.     

अंगावर गुलाबी रंगाचा नक्षी असलेला कुर्ता असून निळ्या रंगाचा सलवार घातलेला आहे. दोन्ही हातात हिरव्या  रंगाच्या प्रत्येकी सहा- सहा बांगड्या आहेत. गळ्यात पांढर्‍या रंगाची चैन असून त्यामध्ये असलेल्या लॉकेटमध्ये इंग्रजी पी अक्षर आहे.  तरूणीच्या दोन्ही पायात पैंजन आहेत.

घटनास्थळी श्‍वान पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र ते  केवळ शंभर फुट अंतरात घुटमळले. पोलिसांनी घटनास्थळी खुनात वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही. 

शनिवारी मध्यरात्री हा खून झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी उपविभीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी भेट दिली असून तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या. पोलिस निरिक्षक विनायक वेताळ याच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे.