Thu, Jul 18, 2019 21:01होमपेज › Satara › ‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’

‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:17PMसातारा : संजीव कदम

रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे.  दररोज विविध अपघातात लाखमोलाचे जीव हकनाक जात असून अनेक संसार, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. काल-परवा सातारा शहर व परिसरात घडलेल्या दुचाकींच्या तीन अपघातात तिघांचा बळी गेला. या घटनांनी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अपघाताला अनेक कारणे असली तरी अती वेग जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. अति वेगाने वाहन चालवल्यामुळेच अनेक दुर्घटना घडत असल्याचे वास्तव आहे. याबाबत बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणांकडून कितीही जनजागृती झाली तरी वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.  ‘आवरा वेगाला, सावरा जीवाला नाहीतर खाईत न्याल कुटुंबाला’ हे लक्षात घ्यायला नको का? 

रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अति वेग, बेदरकार ड्रायव्हिंग, मद्यप्राशन, रस्त्याची दूरवस्था, अपुरी झोप,  अशा अनेक कारणांमुळे होणार्‍या दुर्घटनांनी लाखमोलाचे जीव हकनाक व स्वस्तात जावू लागलेेत.   एका क्षणात होत्याचं नव्हतं होत आहे. जीवाभावाची माणसं क्षणात काळाच्या आड जात असून त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर कोसळणारं दु:ख सहन करण्यापलिकडचे असते. पण त्याचे गांभिर्य वेळीच लक्षात घ्यायला नको का? विशेषत: दुचाकीस्वारांच्या बाबतीत झालेल्या दुर्घटनात बळी जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. सातारा शहर व परिसरात मंगळवार व बुधवारी चार ठिकाणी  दुचाकीस्वारांना अपघात झाला. त्यामध्ये तीन दुचाकीस्वार जीवाला मुकले. नैना रसाळ (रा.बोरखळ) यांचा आरळे येथे, विजय भोसले (रा.केसरकर पेठ) यांचा  गोडोली चौकालगत तर एसपीएस कॉलेजचे प्राचार्य असिफ मणेर (रा.सातारा) यांचा कुरणेश्‍वर घाटात  झालेल्या अपघातामध्ये जीव गेला. या दुर्घटनांनी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

Tags:, keep control, vehicle ,speed ,avoid, accident,