Sun, Oct 20, 2019 23:05होमपेज › Satara › मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो : उदयनराजे (video)

मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो : उदयनराजे (video)

Published On: Oct 01 2019 12:11PM | Last Updated: Oct 01 2019 1:58PM
सातारा: पुढारी ऑनलाईन

विधानसभा व लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली असून उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अर्ज भरण्यापूर्वी उदयनराजे यांनी पत्रकार परिषेद घेतली. राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकांना आपली काम व्हावीत अशा अपेक्षा माझ्याकडून असून त्या पूर्ण करेन असं त्यांनी म्हटलं. यापूर्वी आलेला अनुभव चांगला नव्हता. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

तसेच, पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, माझ्या मतदरासंघात जी अनेक वर्षांपासून जवळपास १९९६ पासून कृष्णा खोऱ्याची जी मुलभूत कामे आहेत, ती अद्यापही मार्गी लागली नसल्याने त्यांनी सांगितले. राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो. कोणाला आवडले किंवा कोणाला आवडते नसेल तर मला काही समस्या नाही,” असेही यावेळी ते म्हणाले.

मंगळवारी सकाळी  गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

श्री. छत्रपती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.