होमपेज › Satara › अलिशान कारमधून देशी दारुची वाहतूक

अलिशान कारमधून देशी दारुची वाहतूक

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

फलटण- सातारा रस्त्यावर अलिशान कारमधून देशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला समजल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी एकाला अटक केली. या कारवाईत 1 लाख 88 हजार रुपयांच्या कारसह 15 देशी दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

रज्जाक दस्तगीर सय्यद (रा.मलवडी ता.फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फोर्ड कंपनीच्या अलिशान कारमधून दारुची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि. 27 रोजी पोलिसांनी सापळा रचला. एमएच 12 ईबी 9463 या कार चालकाला पोलिसांनी थांबायला लावल्यानंतर त्यामध्ये 15 देशी दारुचे बॉक्स असल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव यांनी कारवाईत सहभाग घेतला.