होमपेज › Satara › वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: Jan 11 2018 7:34PM | Last Updated: Jan 11 2018 7:34PM

बुकमार्क करा
कुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील मजरे शेंबडे येथील दुर्गम गावात 77 वर्षाच्या जिवाजी रामचंद्र साळुंखे याने नात्यातल्याच 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सात्यत्याने बलात्कार केला. त्यात पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे पोलिसांनी सांगितले असून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

नात्याला काळीमा फासणारी ही घटना गुरुवारी समोर आल्यानंतर मेढा पोलीस ठाण्याचे स.पो.नि जीवन माने यांनी बलात्कार करणाऱ्या नराधम जिवाजी साळूंखेला अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा  दाखल  करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.