Wed, Feb 20, 2019 23:05होमपेज › Satara › सातारा : सलग सुट्ट्यांमुळे एक्‍सप्रेस वे जाम

सातारा : सलग सुट्ट्यांमुळे एक्‍सप्रेस वे जाम

Published On: Jan 28 2018 6:31PM | Last Updated: Jan 28 2018 6:55PMकुडाळ / लिंब  प्रतिनिधी 

सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पुणे-बेंगलोर  महामार्गवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्‍याचे चित्र दिसून येत आहे.

महामार्गावरील कोंडीमुळे वाहनधारकांचा हिरमोड झाला आहे. सलग तीन दिवसांची मेगा सुट्टी संपल्यानंतर रविवारी राष्ट्रीय महामार्गवरील साताऱ्यातील  आनेवाडी टोल नाक्यासह महामार्गावर जाम होऊ लागले आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट ते वाढे फाट्यापर्यत वाहनांच्या रांगा दुपार पासून लागल्‍याचे चित्र होते. 

महामार्गावरील नागेवाडी ता. सातारा येथे रविवारी वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवारची सुट्टी संपल्याने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने तसेच महामार्गावरील नागेवाडी येथील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक वळवण्यात आली होती. यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या  रांगा लागल्‍या होत्‍या. या वाहतुकीच्या कोंडीने महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.