Wed, Sep 19, 2018 22:52होमपेज › Satara › चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

Published On: May 27 2018 3:39PM | Last Updated: May 27 2018 3:38PMकोरेगाव :  प्रतिनिधी 

अपशिंगे ता. कोरेगाव येथे चारित्र्याचा संशयावरून पत्‍नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत पत्‍नीचा जागीच मृत्‍यू झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी शंकर जयसिंग बुधावले (वय ५५) याने रविवारी दुपारी पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन राहत्या घरासमोर अंगणात सुशिला शंकर बुधावले (वय ५०) हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. जखम मोठी असल्‍याने अतिरक्त स्ञाव झाल्याने तिचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी मृत महिलेची आई   रेखा लाला मदने  (रा. डिस्कळ ता खटाव) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रहिमतपूर पोलिसांनी संशयीत आरोपी शंकर जयसिंग बुधावले यास अटक केली आहे. या घटनेचा  तपास स पो नि श्रीगणेश कानुगडे हे करीत आहेत