Sun, Jul 21, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण 

सातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण 

Published On: Dec 18 2017 6:45PM | Last Updated: Dec 18 2017 6:45PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

इतर राज्यासह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 58 लाख 43 हजार 852 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथावरील देणगीत 7 लाख 64 हजार 601 रूपयांची वाढ झाली आहे. श्री सेवागिरींच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि 17.डिसेंबर रोजी पुसेगाव ता.खटाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रथ मिरवणुकी दरम्यान रथावर अमेरीका,इंग्लंडसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटा भाविकांकडून अर्पण करण्यात आल्‍या आहेत 

रथोत्सवाच्या दिवशी पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला.यंदा दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्‍याचे दिसून आले.