Thu, Oct 17, 2019 04:24होमपेज › Satara › सातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी

सातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खंडाळा : वार्ताहर

खंबाटकी बोगद्यानजीक पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या वारणा दूध संघाच्या टँकरने लक्झरी बसला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे पुढील वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात नागपूर येथील प्रज्ञा ट्यूशन या खासगी क्लासचे ४७ विद्यार्थी सहलीसाठी महाबळेश्वरला आले होते. बसमधील एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून तेरा जण किरकोळ जखमी झाले. यात टँकर व बसचालकासह विद्यार्थी यांचा समावेश आहे.

या अपघातात बस, टँकर व एका ट्रकचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. खंडाळा व शिरवळ पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता झाला.