Sat, Nov 17, 2018 06:12होमपेज › Satara › सातारा : विविहितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या (video)

विविहितेचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

Published On: May 28 2018 1:20PM | Last Updated: May 28 2018 3:14PMकराड : प्रतिनिधी

विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील रविना आकाश माने (वय २१) या विविहितेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाइकांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी ठिय्या मारला. बाळंतपणासाठी रविना यांना उपचारासाठी शनिवारी सायंकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य उपचार आणि देखभाल न केल्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. 

कोळे (ता. कराड, सातारा) येथील रविना यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विहापूर येथील आकाश माने यांच्याशी झाला होता. रविवार, २७ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविना यांना मुलगी झाली. त्यानंतर बाळाची प्रकृती व्यवस्थित होती, मात्र रविना यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे वेणूताई उपजिल्हा रुग्णालयातून रविना यांना तातडीने मलकापूर येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले. कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर तसेच काही वैद्यकीय अधिकारी नातेवाईकांशी चर्चा करत आहेत.