कराड : प्रतिनिधी
कराड (जि. सातारा) तालुक्यातील विविध भागात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शहराच्या विविध भागासह विद्यानगर, बनवडी परिसरात गारांसह पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला.
गुरुवार हा कराडचा बाजाराचा दिवस असतो, त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. सकाळपासून कराडसह तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.