Thu, Jul 18, 2019 06:06होमपेज › Satara › ‘सकारात्मक पालकत्व’ विषयावर रविवारी व्याख्यान

‘सकारात्मक पालकत्व’ विषयावर रविवारी व्याख्यान

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 8:30PMकराड : प्रतिनिधी 

हल्लीची जीवघेणी स्पर्धा, मुलांना आकर्षित करणारी अनेक साधने, यामध्ये तासन्तास रमणारी मुले यामुळे पालकांची मुलांप्रती चिंता वाढत आहे. मुलांची मानसिकता वारंवार बदलत आहे. त्यामुळे पालक  व मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे पालकˆबालक नात्यामध्ये स्नेहबंध कसे राखावेत, आपल्या मुलांची मानसिकता कशी सांभाळावी यासाठी दै. ‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबतर्फे ‘वेदगुरूकुल’ च्या संचालिका बालमानसशास्त्र समुपदेशक मनिषा पाटील यांचा ‘सकारात्मक पालकत्व’ कार्यक्रम रविवार दि. 24 रोजी येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केला आहे. 

दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबकडून कस्तुरींना स्मार्ट बनवण्यासाठी तसेच कस्तुरींसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सभासदांबरोबरच त्यांची मुलेही स्मार्ट होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व पती, पत्नींसाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमामध्ये मनिषा पाटील पालकांनी मुलांशी कसे वागावे, कसे मार्गदर्शन करावे याची सखोल माहिती देणार आहेत. तसेच यावेळी पालकांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्व महिलांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी 8805023653 यांच्याशी संपर्क साधावा.