Thu, May 23, 2019 14:35
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कोंढवली, पानस गावठाणांचा प्रश्‍न मार्गी

कोंढवली, पानस गावठाणांचा प्रश्‍न मार्गी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा-जावली मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी वस्तीवर विकासकामांची गंगा प्रवाहीत करुन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. मतदारसंघातील कोंढवली (लिंब ता. सातारा) आणि पासन (ता. जावली) या दोन पुनर्वसीत गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून तब्बल 86 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

सातारा तालुक्यातील कोंढवली या पुनर्वसीत गावात शाळेभोवती संरक्षक भिंत, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, जावली तालुक्यात पानस या पुनर्वसीत गावासाठी पानस ते कुडाळ पोहोच रस्ता डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम ही कामे मंजूर करण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या सुचनेनुसार प्रशासनाने या कामांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठवले होते. सातारा तालुक्यातील कोंढवली येथील शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी 26 लाख 2 हजार 447 रुपये तर ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 16 लाख 73 हजार 534 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  पानस ते कुडाळ पोहोच रस्ता डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम करणे या कामासाठी 43 लाख 85 हजार 23 रुपये असा भरिव निधी उपलब्ध झाला आहे. निधीच्या उपलब्धतेमुळे कोंढवली येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रश्‍न मार्गी लागणार असून पासन ते कुडाळ पोहोच रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. या तीनही कामांची निविदा प्रक्रीया तातडीने पूर्ण करुन त्वरीत कामाला सुरुवात करावी. कामे दर्जेदार करावीत, अशा सूचना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधीत अधिकार्‍यांना केल्या आहेत.