Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Satara › सातारा : लोणंद पालखी तळाची स्वच्छता (video)

सातारा : लोणंद पालखी तळाची स्वच्छता (video)

Published On: Jul 15 2018 1:06PM | Last Updated: Jul 15 2018 1:06PMलोणंद : प्रतिनिधी  

शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे तीनशे विदयार्थी- विद्यार्थिनींनी हातात झाडू घेत लोणंद चा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुककाम असणाऱ्या लोणंद चा  पालखी तळ व गावातील सर्व रस्ते चकाचक करून सुमारे पंचवीस टन प्‍लास्‍टिक  कचरा जमा करीत प्‍लास्‍टिक मुकत हरित वारी संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

प्‍लास्‍टिक मुकत हरित वारी संकल्पना प्रत्यक्षात

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर लोणंदचा पालखी तळ व गावातील सर्वच रस्ते प्लास्टिक व अन्य कचऱ्याने भरुन गेले होते. या उपक्रमाने रस्ते पुन्हा चकाचक झाले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपक्रम

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्‍लास्‍टिक मुक्त निर्मल वारी हा उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असुन माऊलीचा पालखी सोहळा  सातारा जिल्ह्यात आल्यापासून पाडेगाव ते बरड या दरम्यानच्या पालखी मार्ग व मुक्काम ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहे. या उपक्रमात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयातील सुमारे  तीनशे विद्‍यार्थी  सहभागी झाले आहेत.

 या उपक्रमास  स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत यांचे सहकार्य

 माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर  प्रबोधन पालखी सोहळा पुढे गेल्या नंतर स्वच्छता केली जात आहे. ही स्वच्छता स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्या सहकार्याने केली जात आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ.डी .के. गायकवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.एन. बी.माने, प्रा. आर .व्ही .यादव, प्रा. शेलार, प्रा .चव्हाण , त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

लोणंद नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे सहकार्य 

 माऊलीचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामानंतर पुढे गेल्या नंतर आज सकाळी साडेसात पासून सुमारे 250 ते 300 विद्‍यार्थ्‍यांनी लोणंद गावातील सर्व रस्ते व पालखी तळ स्वच्छ केला. त्यासाठी त्यांना लोणंद नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे दोन ट्रक्टर व कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्यामध्ये आरोग्य विभाग प्रमुख सदाशिव शेळके यांनी नियोजन केले होते.

संपूर्ण प्लस्‍टिक व कचऱ्याने माखुन गेलेले रस्ते काही तासातच पुन्हा चकाचक झाल्याचे चित्र लोणंदकरांना पहावयास मिळाले . या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.