Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Satara › सातारा : महामार्गावर अपघात, फलटणचे पोलिस अधिकारी बचावले

सातारा : महामार्गावर अपघात, फलटणचे पोलिस अधिकारी बचावले

Published On: Mar 17 2018 1:02PM | Last Updated: Mar 17 2018 1:02PMभुईंज : वार्ताहर

महामार्गावरुन फलटणकडे चाललेले फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मारुती कारला  बदेवाडी (ता. वाई) येथील पुलावर पाठीमागून येणार्‍या मालट्रकने धडक दिली. त्यामध्ये पोलिस निरीक्षक सावंत जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथे सुरु असलेल्या पोलिस भरतीचा बंदोबस्त करुन पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत हे फलटणकडे चाललेले होते. दुपारी बारा वाजता भुईंज हद्दीतील बदेवाडी पुलावर सावंत यांच्या मारुती कारला पाठीमागून येणार्‍या मालट्रकने धडक दिली. यामध्ये सावंत यांची कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली. सुदैवाने या अपघातातून सावंत बचावले असून त्यांना लगेच भुईज परिसरातील  ग्रामस्थांनी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातानंतर पळून जाणार्‍या माल ट्रकचालकास ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले. घटनास्थळी भुईंज पोलिस हजर झाले असून ते अधिक तपास करत आहेत.