होमपेज › Satara › आमदार समर्थकांच्या जामिनावर ७ रोजी सुनावणी

आमदार समर्थकांच्या जामिनावर ७ रोजी सुनावणी

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:39PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सुरुचि राडा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेलेल्यांना आणखी दिलासा मिळाला असून 7  फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, अटकपूर्व प्रकरणातील संशयितांचे पोलिसांनी दि. 17 ते 22 जानेवारीपर्यंत जाबजबाब घेण्यास सांगितले आहे.

सुरुचि राडा प्रकरणात सातारा पोलिसांनी घटनेनंतर अटकसत्र केल्यानंतर खासदार व आमदार गटातील अनेक समर्थक सातार्‍यातून पसार झाले. पसार असणार्‍यांमध्ये काही जणांनी अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला.  यावेळी बचाव व सरकार पक्षाची बाजू ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आमदार गटातील समर्थकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आमदार समर्थकांना थोडासा दिलासा मिळत तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला.  तात्पुरता जामीन मिळाल्याने पोलिसांना त्याबाबत उच्च न्यायालयात बाजू मांडायची होती. मात्र, तिन्ही वेळेला पोलिसांनी वेळ मागून घेतली. गुरुवारी याबाबतची पुढील सुनावणी होती. त्यामुळे सातारा पोलिस उच्च न्यायालयात कशी बाजू मांडणार? याकडे लक्ष असताना पोलिसांनी पुन्हा बाचू मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने याप्रकरणातील दोषारोपपत्र दाखल झाल्याने वेळीच पोलिसांनी म्हणणे द्यावे, अशी सूचना  न्यायाधीशांनी  करुन दि. 17 ते 22 या कालावधीत जबाब घेण्यास सांगितले. या कालावधीत म्हणणे मांडल्यानंतर त्याप्रकरणी पुढील सुनावणी दि. 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.दरम्यान, तात्पुरता जामीन  मिळालेल्यांमध्ये राजू भोसले, व्रिकम पवार, जयेंद्र चव्हाण, मयूर बल्‍लाळ, अमोल मोहिते, फिरोज पठाण यांचा समावेश आहे.