Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Satara › सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांवर गुन्हा

सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांवर गुन्हा

Published On: May 03 2018 3:27PM | Last Updated: May 03 2018 3:26PMसातारा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच त्यानंतर त्या मुलीशी लुटूपुटूचे लग्न करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी संबंधित पीडितेने लैंगिक शोषण झाल्याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेली होती. यानंतर सातारा शहर पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संबंधित पीडिता अल्पवयीन होती. त्याचबरोबर संशयित आरोपीचे पहिले लग्नही झाले होते. त्यावेळी संबंधित पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांना भेटून लव्ह जिहादची तक्रार केली होती. त्यामुळे सातार्‍यातील सामाजिक वातावरण गढूळ झाले होते. परंतू पोलिसांनी यामध्ये सुवर्णमध्य साधून हा विषय संपवला होता. मात्र यानंतर यातील संशयित आरोपी समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका, सातारा), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहिम व आपटे (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांनी यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीचे खोटे लग्न करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. समीर मुजावर याच्याकडे संबंधित पीडिता शिकवणीसाठी येत होती. यावेळी समीर मुजावर याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याबरोबर खोटेनाटे लग्न करून त्याचे मोबाईल चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित चौघांनी पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार संबंधित पीडितेने व तिच्या कुटूंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत चौघांवरही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बेंरदे करीत आहेत.