Fri, Jul 19, 2019 19:57होमपेज › Satara › जुगार अड्ड्यावर तंटामुक्ती अध्यक्षासह ५ जणांना अटक

जुगार अड्ड्यावर तंटामुक्ती अध्यक्षासह ५ जणांना अटक

Published On: Mar 07 2018 4:00PM | Last Updated: Mar 07 2018 4:00PMसातारा : प्रतिनिधी

बीबी ता.फलटण येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्‍या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असून, संशयितांकडून 1 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांमध्ये तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षाचाही समावेश आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा.बीबी), आबा बबन तरडे (वय 48, रा.मलवडी), प्रकाश बबन बोबडे (वय 45, रा.बीबी), संजय लक्ष्मण टकले (वय 38, रा.मलवडी), गणेश विठ्ठल नाकयवडी (वय 40, रा.आळजापूर सर्व ता.फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यात अटक केलेल्‍यांत बळवंत नलवडे हा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बीबी गावच्या हद्दीत जुगार खेळत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिसांनी पथक करून त्यानुसार छापा टाकला असता, संशयित मोकळ्या रानात बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर परिसरातून दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकून 1 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल  जप्त केला.

दरम्यान, बीबी गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर परिसरात बघ्यांची  मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेवून त्‍यांना लोणंद पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार नागे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कचरे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.