Thu, Aug 22, 2019 08:21होमपेज › Satara › अपंगांचा दाखल्‍यासाठी अधिकार्‍यांना घेराव (Video)

अपंगांचा दाखल्‍यासाठी अधिकार्‍यांना घेराव (Video)

Published On: Jan 10 2018 5:02PM | Last Updated: Jan 10 2018 5:02PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

अपंग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगत्वाच्या दाखल्याची गरज असते. सातारा जिल्हा रुग्णालयात अपंगाना वेळेवर दाखले मिळत नसल्‍याने नागरिकांचा आज उद्रेक झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. 

सातारा जिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे अपंगांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे अपंगांना अनेक शासकीय योजनांपासून वंचीत राहावे लागते. आज जिल्‍हा रुग्णालयात दाखल्‍यासाठी आलेल्‍या अपंगांनी संतप्त होउन जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. अचानक झालेल्‍या या प्रकारामुळे अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. यावेळी अपंग नागरिकांनी अधिकाऱ्यांना दाखल्‍यांच्या विलंबाबाबत प्रश्नांची सरबंत्‍ती केली. सुमारे अर्धातास हा प्रकार या ठिकानी सुरू होता.