Sun, Mar 24, 2019 04:52होमपेज › Satara › पहिली प्रवेशाचा बिगुल वाजला

पहिली प्रवेशाचा बिगुल वाजला

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी लागण्यापूर्वीच  पहिलीच्या प्रवेशाचा बिगुल वाजला आहे. दि. 16 मेपर्यंत  प्रवेश अर्जाचे वितरण करण्यात येणार असून दि.28 मे ते 5 जून अखेर आलेल्या अर्जातून आरक्षणानुसार लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी लागली आहे. तर काही शाळांनी स्कॉलरशीपचे जादा तास सरू केले आहेत. त्यापूर्वीज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पहिली प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  दि. 2 ते 16 मे पर्यंत शाळांमधून प्रवेश अर्ज वितरण करण्यात येणार आहेत. दि. 17 ते 22 मे अखेर प्रवेश अर्ज त्रुटीपुर्ततेसह स्वीकारण्यात येणार आहेत. दि. 23 ते 26 मे अखेर प्राप्त अर्जाची छानणी करून सामाजिक आरक्षणानुसार याद्या करून शाळेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. दि. 28 मे ते 5 जूनअखेर प्राप्त अर्जातून आरक्षणानुसार सोडत पध्दतीने पालकांच्या समोर निवड  प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.  दि. 6 व 7 जून रोजी सोडतीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या नोटीसबोर्डवर लावण्यात येणार आहे. दि. 8 ते 12 जून अखेर सायंकाळी 5 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहेत. दि.13 ते14 जून अखेर  किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला याची सविस्तर माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावी.प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी अशा सूचना  प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिल्या आहेत.