Fri, Jul 19, 2019 07:03होमपेज › Satara › सातारा : फायरिंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक

सातारा : फायरिंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक

Published On: Jun 02 2018 12:25PM | Last Updated: Jun 02 2018 12:25PMसातारा : प्रतिनिधी

सातारा येथील बुधवार नाका परिसरात गुरुवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला घटनेनंतर पळून गेलेला मुख्य संशयित ऋषभ जाधव याला अटक करण्यात यश आले आहे. शनिवारी पहाटे त्याला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

ऋषभ जाधव याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला व आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित ऋषभ याने प्रेमप्रकरणाच्या कारणातून अतिक शेख याच्यावर गुरुवारी भरदुपारी ५ वाजता वर्दळीच्या ठिकाणी फायरिंग केले. ऋषभ जधाव याने पिस्टलच्या साहाय्याने अंधाधुंद गोळीबार केल्याने अद्याप सातारा हादरलेला आहे. सुदैवाने या हल्ल्यात अतिक बचावला आहे मात्र त्यावेळी बुधवार नाका येथील काहीही संबंध नसलेल्या युवतीला चुकून ती गोळी लागली. 

हल्ल्यात युवती गंभीर जखमी असून अद्याप तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोन युवकांच्या वादात सामान्य सातारकरांचा जीव टांगणीला लागल्याने त्याबाबत संताप निर्माण झाला होता. संतप्त जमावाकडून त्याला गोळ्या घालण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर संशयित ऋषभ दोन मित्राच्या साहाय्याने दुचाकीवरून पळून गेला. गुरुवारपासून पोलीस त्याचा शोध घेत असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. अखेर पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जऱ्हाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर येथून त्याला शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.