Fri, Jul 19, 2019 20:17होमपेज › Satara › सातार्‍यामध्ये मेडिकलला आग; उदयनराजेंच्याकडून पाहणी 

सातार्‍यामध्ये मेडिकलला आग; उदयनराजेंच्याकडून पाहणी 

Published On: Dec 05 2017 9:44PM | Last Updated: Dec 05 2017 9:44PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात अजिंक्य कॉलनी येथील विशाल मेगा मार्ट बिल्डींगच्या खाली असणार्‍या गाळ्यातील मेडिकलला मंगळवारी रात्री आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे येथील नागरिकांची धावपळ उडाली. आग लागल्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असून रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उदयनराजे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी, विशाल मेगामार्टजवळील गाळ्यातून मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट पसरु लागले. पावसाचा व थंडीचा जोर असल्याने सुरुवातीला कोणाला काही समजले नाही. कोणीतरी टायर किंवा कचरा जाळला असेल अशी नागरिकांची समजूत झाली होती. मात्र, पाहता-पाहता धुराचे जास्तच वाढले. याचवेळी विशाल मेगा मार्ट परिसरातून धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.