Wed, Jul 17, 2019 08:47होमपेज › Satara › तिसरे दोषारोपपत्रही दाखल

तिसरे दोषारोपपत्रही दाखल

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:36PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सुरुची राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून, यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहा जणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

सुरुची राडा प्रकरणात नुकतीच दोन दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत.  पोलिस तक्रारदार व आमदार गटाचे तक्रारदार असलेली ही दोषारोपपत्रे आहेत. तिसर्‍या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रदीप जाधव हे करत होते. आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरुद्ध अजिंक्य मोहिते याने तक्रार दिली आहे. या तिसर्‍या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सुमारे 100 पानांपेक्षा अधिक आहे.

दहा दिवसांच्या कालावधीत सुरुचि राडा प्रकरणातील तिन्ही दोषारोपपत्र दाखल झाली आहेत. दरम्यान, अटकपूर्व व नियमित जामिनाचा अर्ज दाखल करण्यासाठी आता संशयितांच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चेतन सोळंकी, निखिल सोडमिसे, हर्षल चिकणे, प्रतीक शिंदे, उत्तम कोळी, निखिल वाडकर या सहा जणांनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात  अर्ज दाखल केला होता. त्यांचा हा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वीच अटक केली होती. दरम्यान, पोलिस तक्रारदार असलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन मिळाला नसल्याने सध्या तरी या संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे.