Thu, Sep 20, 2018 18:30होमपेज › Satara › सातारा : परळीत झालेल्या मारामारीत जवान जखमी

सातारा : परळीत झालेल्या मारामारीत जवान जखमी

Published On: Mar 24 2018 6:41PM | Last Updated: Mar 24 2018 6:41PMपरळी : वार्ताहर

परळी आणि कूस बुद्रुक येथील युवकांमध्ये  पूर्ववैमनस्यातून परळी येथे झालेल्या मारामारीत सैन्यदलातील जवान अरुण जांभळे हे जखमी झाले आहेत. यातील संशयित पाच आरोपींना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गौरव मोहन जांभळे याने वडिल मोहन जांभळे यांचा 51 व्या वाढदिवस कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हा प्रकार घडला.  भांडणे सोडवण्यासाठी गेलेला सैन्यदलातील जवान  अरुण जांभळे हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे. या प्रकरणी कूस बुद्रुक येथील 3 व अन्य 2 अशा पाच संशयितांना तालुका पोलिसांच्या ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून धारधार शस्त्रास्त्रे व दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहेत.