Mon, Mar 25, 2019 03:30
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका वाहतूक व्यवस्थेत बदल

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका वाहतूक व्यवस्थेत बदल

Published On: Apr 13 2018 4:57PM | Last Updated: Apr 13 2018 4:57PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील पोवईनाका येथे उड्डाणपूलाचे (ग्रेड सेपरेटर) बांधकामाची सुरूवात  दि. 15 मार्च 2018 रोजी पासून झालेली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एस. टी. बसेस, अवजड वाहनांना तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांस हा रस्ता बंद होणे आवश्यक असल्याने संदीप पाटील पोलीस अधिक्षक सातारा यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 13 एप्रिल 2018 पासून पुढील आदेश होई पर्यंत या मार्गावरील वाहतूक पुढील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

एस.टी. बसेस व अवजड वाहनांना दैनंदिन वाहतूकीस पर्यायी असणारा मार्ग पुढीलप्रमाणे. एस.टी. स्टॅण्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटाकडे जाणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड भुविकास बँक-जुना आर.टी.ओ. चौक-वाढे फाटा मार्गे जातील.

एस. टी. स्टॅन्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा कडे जाणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड-पारंगे चौक-सिव्हिल हॉस्पिटल-मुथा चौक-बांधकाम भवन-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे जातील.

ए.टी.स्टॅन्ड परिसरातून बोगद्यामार्गे तसेच कासकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस, जड अवजड वाहने राधिका सिग्नल-राधिका रोड मार्गे राधिका टॉकिज-मोतीचौक-चांदणी चौक-समर्थ मंदिर मार्गे जातील.

शहरात प्रवेश करण्यासाठीचा मार्ग पुढील प्रमाणे राहील. कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शिराज फाटा-अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे न येता खेड फाटा - सैनिक नगर - सदर बझार - सेंट थॉस एलफिस्टन चर्च- रिमांडहोम- जुना आर. टी. ओ. चौक मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.
बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने समर्थ मंदिर-मोती चौक-पोलीसमुख्यालय-प्रिया व्हरायटील-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.

बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शाहु चौक-अलंकार हॉल कॉर्नर-आर. के. बॅटरी-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटीज-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.

एस.टी.स्टॅन्डकडुन पोवईनाका मार्गे जाणारे वाहनांकरीता काँग्रेसभवन ते पोवई नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. या साठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहील. काँग्रेस भवन ते प्रिया व्हरायटी-आर. के. बॅटरी कॉर्नर. बस स्टॅन्ड ते पारंगेचोक - मुथा चौ - बांधकाम भवन. राधिका सिग्नल-राधिका रोड-राधिका टॉकीज चौक मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध आहेत.

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळै सातारा शहरातील मोती चौक ते शाहु चौक तसेच मोती चौक ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवईनाका एकेरी वाहतुक व्यवस्था पुढील आदेशा पर्यंत शिथिल करण्यात येत आहे.

पार्किंग व नोपार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. हॉटेल मिलन ते हॉटेल मोनार्क (मरीआई कॉम्प्लेक्स साताराच्या पाठीमागे) या जाणाऱ्या रोडवर हॉटेल महाराजाचे पाठीमागील गेट ते हॉटेल गुलबहारचे पाठीमागील गेट पर्यंत रोडच्या उजव्या बाजूस वाहने पार्ककरावीत. पार्किंग दिलेला मार्ग सोडून या मार्गावर इतरत्र कोटेही वाहने पार्किंग करु नयेत. या मार्गावरील पुर्वीची सम-विषम पार्किंग व्यवस्था स्थगित करण्यात येत आहे.

तरी सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन संदीप पाटील पोलीस अधिक्षक सातारा यांनी केले आहे.