Wed, Jan 22, 2020 20:18होमपेज › Satara › रामराजे राष्ट्रवादीतच

रामराजे राष्ट्रवादीतच

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 11:33PM
फलटण : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. रामराजेंची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीतच राहण्याचा  निर्णय झाला.  दरम्यान, फलटण मतदार संघातून राष्ट्रवादीने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली असून मुंबई येथे माध्यमांशी बोलताना रामराजेंनी दीपक चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.  

रामराजे ना. निंबाळकर राष्?ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राष्?ट्रवादीकडून  बुधवारी रात्री उशिरा फलटणमध्?ये विद्यमान आमदार दीपक चव्?हाण यांनाच उमेदवारी दिल्?याने ना. रामराजे यांनी दीपक चव्?हाण यांचाच प्रचार करणार असून मी राष्?ट्रवादी काँग्रेसमध्?येच असल्?याचे सांगितले. तत्पूर्वी रामराजेंनी शरद पवार यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. 

मध्यंतरीच्या घडामोडीत  फलटणच्?या राजे गटातील कार्यकर्त्यांनी रामराजेंना राष्?ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्?याचा आग्रह धरला होता. रामराजेंनी यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नव्?हता. नुकत्?याच झालेल्?या युवा संवाद मेळाव्?यातही त्?यांनी दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्?याचे सांगितले होते. त्या?मुळे रामराजे शिवसेनेत जाणार अशा चर्चा सुरू होत्?या. महायुतीच्?या जागा वाटपात फलटणची जागा रिपाइंला गेली. यानंतर रामराजेंनी मुंबईत प्रसारमाध्?यमांसमोर आपली भुमिका जाहीर केली. मी राष्?ट्रवादीतच असून पक्षाने उमेदवारी जाहीर  केलेल्?या दीपक चव्?हाण यांचा प्रचार करणार असल्?याचे सांगितले.

यानंतर त्?यांनी सोशल मीडियावर ’आता मी युध्?दाला तयार’ अशी पोस्?ट करत पक्षांतराच्?या सर्व चर्चांना अखेर विराम दिला आहे. त्?यामुळे राजे गटातील संभ—मावस्?था दूर झाली आहे.