Tue, Jul 23, 2019 04:29होमपेज › Satara › संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणला बदली

सातारा पोलिस दल ‘स्मार्ट’ करणाऱ्या 'एस.' 'पीं.’ ची बदली

Published On: Jul 28 2018 9:59AM | Last Updated: Jul 28 2018 10:02AMसातारा : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेची बसवलेली घडी ही खूप चांगली आहे. त्यांनी जिल्ह्यात कामाचा वेगळा पायंडा घालून दिला आहे. त्यांच्यासारखाच कारभार सातार्‍यात करून कायदा व सुव्यवस्था सांभाळू, असा विश्‍वास सातार्‍याचे नवनियुक्‍त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्‍त केला आहे. दरम्यान, एसपी देशमुख हे 3-4 दिवसांत सातार्‍याचा चार्ज स्वीकारणार आहेत. 

विद्यमान पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. तर सातार्‍याच्या अधीक्षपदी पंकज देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. देशमुख यांनी यापूर्वी नगर येथे अप्पर पोलिस अधीक्षक तर उस्मानबाद येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. संदीप पाटील यांनी सातार्‍यात खूप चांगले काम केले आहे. त्यांच्या कामामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसला असून क्राईम रेट खाली आला आहे. त्यांच्या कामामुळेच त्यांनी सातारकरांची मने जिकली आहे.  संदीप पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न राहिल. दरम्यान, मराठा आंदोलना दरम्यान दंगलीच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश मिळाल्यानंतर सातार्‍याचा चार्ज स्विकारणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.