Thu, Nov 15, 2018 20:06



होमपेज › Satara › कराड : तासवडे एमआयडीसीला राष्ट्रवादीकडून टाळे(व्हिडिओ)

कराड : तासवडे एमआयडीसीला राष्ट्रवादीकडून टाळे(व्हिडिओ)

Published On: Apr 22 2018 5:17PM | Last Updated: Apr 22 2018 5:12PM



तासवडे टोलनाका : वार्ताहर 

एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तासवडे (ता. कराड, जि. सातारा) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र, या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त होत पदाधिकाऱ्यांनी एमआयडीच्या गेटलाच टाळे ठोकले. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोकोचाही इशारा दिला आहे.

1985 साली स्थानिक ग्रामस्थांचा विरोध डावलून तासवडे एमआयडीसीसाठी जमिन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी तसेच उद्योगांसाठी प्लॉट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजवर स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच स्थानिक भुमिपुत्रांना प्लॉट उपलब्ध झाले का? झाले असतील तर किती? किती भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या? एमआयडीसीमधील उद्योग कोणत्या कारणासाठी चालू आहेत, याचा लायसन्स मिळावे, रयत गारमेंटसारखी संस्था कोण चालवत आहे? आजवर किती सबसिडी घेतली? या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.

मात्र, त्यानंतरही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळेच रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी एमआयडीसीचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे संतप्त होत प्रशांत यादव, सुहास बोराटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. 

Tags :  taswade MIDC karad, satara district, karad NCP leaders