Wed, Jul 17, 2019 18:20होमपेज › Satara › जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Published On: Jun 06 2018 1:45PM | Last Updated: Jun 06 2018 1:45PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलीस दलातील पोलीस अधिकारांच्या बदल्यांना वेग आला असून बुधवारी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात चार नवीन पोलीस निरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आणखी एक वर्षाचा कालावधी वाढवून मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यातून बदलून गेलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये फलटणचे पोनि अशोक शेळके, मुख्यालयातील पोनि संभाजी म्हेत्रे, कराडचे पोनि प्रमोद जाधव व राजेंद्रकुमार राजमाने यांचा समावेश आहे. तसेच नवीन बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकामध्ये पोनि विश्वास साळुंखे, सजन हंकारे, बंडोपंत कोंडुभेरी, अमरनाथ वाघमोडे यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट व पोनि दत्तात्रय कुलथे यांना एक वर्ष वाढवून कालावधी मिळाला आहे.

Tags : satara district, 4 Police Inspector, Transfers, satatra news