Tue, Nov 20, 2018 21:08होमपेज › Satara › साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी

साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी

Published On: Dec 03 2017 7:32PM | Last Updated: Dec 03 2017 7:32PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात जिल्ह्यातील विवध दत्त मंदिरात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दत्तजयंतीच्या पार्श्वभुमीवर आज सातारा शहर व परिसरातील  विविध दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  विविध दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. आज रविवार असल्‍याने शहरातील दत्‍त मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.