Sun, May 26, 2019 21:14होमपेज › Satara › विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव : सभासद नावनोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव : सभासद नावनोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:11PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरणार्‍या गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. दरम्यान दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या सभासद नावनोंंदणीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

 दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी वर्षभर नवनवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवामध्ये गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  विजेत्यांना आकर्षक भेट दिली जाणार आहे.

गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे  सहप्रायोजक  वाई येथील लाजरी साडी सेंटरचे किशोर शिंदे व कुमार नवघणे हे आहेत.  वाई  शहरवासियांसाठी लाजरी साडी सेंटर गेल्या सात वर्षांपासून  ड्रेस मटेरियल, पैठणी, वर्क पैठणी, कांजीवरम, लोटस पैठणी, काटपदर साडी याचबरोबर लग्नाचा बस्ता यासाठी सज्ज आहे.

 दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने वर्षभरात होणार्‍या विविध कार्यशाळांनाही या सभासदांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाईल.  विविध सिने कलाकारांना भेटण्याची संधीही महिलांना मिळणार आहे. 

कस्तुरी क्लबच्या नूतन वर्षातील सभासद नावनोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.  महिलांनी कस्तुरी क्लबचे सभासद होवून सर्व सवलतींचा  फायदा घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.  अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कस्तुरी क्लब कॉर्डिनेटर तेजस्विनी  बोराटे 8805007192 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.