Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Satara › ‘अप्सरा’ च्या लावण्यांवर थिरकल्या कस्तुरी

‘अप्सरा’ च्या लावण्यांवर थिरकल्या कस्तुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्यावतीने महिला व युवतींसाठी शाहू कलामंदिर येथे आयोजित केलेल्या लावणी सम्राज्ञी अर्चना सावंतच्या ‘अप्सरा आली’ला महिलांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.टाळ्यांच्या गजरात आणि शिट्ट्या वाजवून त्यांनी लावणीला जबरदस्त दाद दिली.  ‘या रावजी बसा भावजी...’, ‘कैरी पाडाची..’, ‘कुणीतरी न्याहो   मला फिरवायला...’, ‘सोडा सोडा राया नाद खुळा...’, ‘शांताबाई...’ यासारख्या लावण्यांबरोबरच  ब्रिंग इट ऑन, ए मेरा दिल  प्यार का दिवाना.. मैं तुझको मिलने आ जाऊ, झिंगझिंग झिंगाट  अशा अनेक हिंदी मराठी गाण्यांवर कस्तुरीच्या सदस्या थिरकल्या. 

लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत  व त्यांच्या सहकलाकारांनी कार्यक्रमात अनेक ठसकेबाज लावण्या सादर केल्या. उत्कृष्ट संगीताच्या जोडीला नृत्यांगनांच्या दिलखेचक अदा थेट महिला सदस्यांच्या मनाला जाऊन भिडल्या आणि उपस्थित महिलांनी एकच जल्लोष करत सभागृह दणाणून सोडले. 

या रावजी... झाल्या तिन्ही सांजा... चोरीचा मामला.... सोडा सोडा राया नाद खुळा... लाडाची मी लाडाची... अशा बहारदार लावण्यांचा नजराणा  लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांनी सादर केला. सैराट, शांताबाई.. चिमणी उडाली भूर..  या गाण्यांवर   कलाकारांनी महिलांमध्ये येऊन डान्स केल्याने महिलाही त्यांच्यासमवेत थिरकल्या. हिल पोरी हिला... या गाण्यातील नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमस्थळी अनेक महिलांनी  नावनोंदणी करुन रिटर्न गिफ्ट मिळवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कस्तुरी  क्लबच्या कमिटी सदस्या नीता पवार, माही चव्हाण, स्वाती शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा कासट, अलका शेटे, कोल्हापूर इव्हेंट टीमच्या राजश्री पाटील, अमोल चौगुले यांचे सहकार्य लाभले. कस्तुरी क्लबच्या को-ऑर्डिनेटर तेजस्विनी बोराटे यांनी सूत्रसंचलन केले.