Thu, Jun 27, 2019 13:39होमपेज › Satara › सातारा येथे आज पाणीपुरवठा विस्कळीत 

सातारा येथे आज पाणीपुरवठा विस्कळीत 

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:47PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

महावितरणच्या शेंद्रे (ता. सातारा) येथील उपकेंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी विजेची एक्स्प्रेस लाईन बंद करण्यात आल्याने शहापूर उद्भव योजनेचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहरातील पाणीटाक्यांना पुरेशी पाणीपातळी मिळाली नाही. परिणामी, दि. 10 व दि. 11 रोजी शहरास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा विभागाने महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून विद्युतपुरवठा सुरळीत केला. मात्र, शहरातील पाणीटाक्यांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार्‍या यादोगोपाळ पेठ, सदाशिव पेठ व  प्रतापगंज पेठ (काही भाग), सोमवार पेठ, भवानी पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, माची पेठ, केसरकर पेठ, दुर्गा पेठ, राजसपुरा पेठ, नकाशपुरा पेठ, मल्हार पेठ, करंजे पेठ, मेहेर देशमुख कॉलनी, बाबर कॉलनी, कुंभारवाडा परिसर, रविवार पेठ, पंताचा गोट परिसरामध्ये दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केले आहे.