Fri, Apr 26, 2019 15:50होमपेज › Satara › शिंगणवाडीच्या दगडी विहिरीत मुबलक पाणी

शिंगणवाडीच्या दगडी विहिरीत मुबलक पाणी

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:28AMचाफळ : राजकुमार साळुंखे

चाफळ विभागामध्ये शेकडो वर्षापूर्वीच्या अनेक विहिरी आहेत. त्यातीलच शिंगणवाडी (ता. पाटण) येथील गावाला पाणीपुरवठा करणारी पुर्वीची जुनी विहीर आहे. 

सुमारे 70 वर्षापूर्वीची ही विहीर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सध्या या विहिरीचा वापर होत नसल्याने मुबलक पाणी असून देखील विहिरीच्या आजूबाजूला भरपूर झाडी वाढली आहे. तर शिंगणवाडी येथील बागेत छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट झाली होती, त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या फार जुन्या  विहिरीत आज देखील भरपूर पाणी आहे. या पाण्याचा वापर पिण्यासाठी आजही ग्रामस्थ करतात. चाफळ भागात भरपूर पाऊस होतो.  याठिकाणी विहिरींमधील पाणी वर्षभर गावास पुरत असे. शिंगणवाडीतील जुन्या विहिरीचा वापर सध्या होत नाही. त्यामध्ये झाडे, झुडपे वाढली आहेत. 

तर माजगाव (ता. पाटण) येथील जुनी विहिरीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. माजगांव येथील मोहनराव पाटील यांच्या शेतातील अनेक वर्षांपूर्वीची जुन्या विहिरीच्या पाण्यावर सुमारे साठ ते सत्तर एकर जमिनीला मुबलक पाणी उन्हाळ्यात मिळत असते. अशा या जुन्या ऐतिहासिक विहिरींचे जतन केल्यास या भागात पाण्यासाठी लोकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी कधीच वणवण फिरावे लागणार नाही. 
 

Tags : satara chaphal,  Shingnwadi, well,