Thu, Nov 22, 2018 01:30होमपेज › Satara › साताराजवळ 'द बर्निंग कार'चा थरार

साताराजवळ 'द बर्निंग कार'चा थरार

Published On: Aug 06 2018 9:57PM | Last Updated: Aug 06 2018 9:57PMकोरेगाव : प्रतिनिधी

सातरा- कोरेगाव रस्त्यावरील माहुली येथे बंद पडलेली कार टोचनद्वारे घेवून जात असताना शॉर्ट सर्किट होवून कारने पेट घेतला. या आगीत ती जळून अक्षरश: खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कारने पेट घेतल्यानंतर मात्र सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळी झेन ही कार बंद पडली होती. बराच वेळ कार सुरु करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ती सुरु होत नसल्याने अखेर भाकरवाडी येथे घेवून जाण्यासाठी टोचन बोलवण्यात आले. टोचनद्वारे कार घेवून जात असताना अचानक कारमधून धूर येवू लागला. पाहता पाहता कारने पेट घेतला. अवघ्या १० मिनिटांमध्ये कार जळून खाक झाली. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी  धाव घेवून पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत मात्र घटनेची नोंद झालेली नव्हती.