Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Satara › सातारा : कार दुभाजकावर आदळल्याने दोघे गंभीर

सातारा : कार दुभाजकावर आदळल्याने दोघे गंभीर

Published On: Feb 03 2018 9:01PM | Last Updated: Feb 03 2018 9:00PMसातारा : प्रतिनिधी

सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयासमोर (कोर्ट) शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुभाजकावर चारचाकी कार आदळल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामध्ये कारच्या दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या असून कारचा चक्काचूर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी पोवई नाक्यावरुन बॉंबे रेस्टॉरंटकडे कोल्हापूर पासींगची कार भरधाव वेगाने निघाली होती. कार जिल्हा न्यायालयाच्या समोर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट दुभाजकावर जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचे दोन्ही एअरबॅग ओपन झाले. क्षणात मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. कारमध्ये जखमींना तत्काळ परिसरातील नागरिकांना बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.