Mon, Jun 24, 2019 21:36होमपेज › Satara › शिवज्योत आणताना युवकाचा मृत्यू

शिवज्योत आणताना युवकाचा मृत्यू

Published On: Apr 17 2018 4:00PM | Last Updated: Apr 17 2018 4:00PMभुईंज : वार्ताहर

शिवनेरी गडावरून शिवज्योत आणताना चाकण (जि. पुणे) येथे झालेल्या अपघातात पाचपुतेवाडी, ता. वाई येथील युवक ठार झाला, तर इतर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार दि १६ एप्रिल रोजी रात्री घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाचपुतेवाडीचे युवक शिवज्योत आणण्यासाठी टेम्पो व सोबत एक दुचाकी घेवून शिवनेरी किल्ल्‍यावर गेले होते. ज्योत घेऊन परत येत असताना चाकण येथे ज्योत समवेत असणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार ठोकर दिली. या धडकेत दुचाकी चालक स्वप्निल अरविंद चव्हाण (वय 24) हा टेम्पोच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेल्या अमर चंद्रकांत पाचपुते (वय 24) याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर विनायक रामचंद्र गोळे वय 26 हा किरकोळ जखमी झाला आहे. मयत स्वप्नील हा हिंजवडी येते मल्टिनॅशनल कम्पनीत नोकरीस आहे तो कुटुंबात एकुलता एक मुलगा आहे. अपघाता नंतर पळून जाणाऱ्या आयशर टेम्पोचा पाठलाग करून चालकाला पकडण्यात आले आहे.