Sun, Feb 24, 2019 05:05होमपेज › Satara › भिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ मार्चला महामोर्चा

भिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ मार्चला महामोर्चा

Published On: Mar 23 2018 8:01PM | Last Updated: Mar 23 2018 8:01PMसातारा : प्रतिनिधी

जिग्नेश मेवानी, उमर खालिद, अॅड प्रकाश आंबेडकर, कोळसे -पाटील यांना अटक करावी. एकबोटे आणि भिडे गुरुजींवर खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी सत्याच्या सन्मानार्थ सातार्‍यात दि. 28 मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवप्रतिष्ठानकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

पुण्यात एल्गार परिषदेमध्ये तरूणांची माथी भडकावणारे उमर खालिद, जिग्नेश मेवानी, अॅड. प्रकाश आंबेडकर हे मोकाटच फिरत आहेत. जे निष्पाप आहेत, ज्यांचा कोरेगाव भीमा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही, मात्र यात त्यांचे नाव विनाकारण जोडले जात आहे. त्‍यामुळे यातील दोषींना पकडून एकबोटे आणि भिडे गुरुजींवरील खोटे गुन्हे मागे घ्‍यावेत या मागणीसाठी सातार्‍यात २८ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संदीप जायगुडे, केदार डोईफोडे, काशिनाथ शेलार आणि चंदन जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Tags : satara bhide guruji withdraw cases for 28 march maha morcha organize