Sun, Feb 17, 2019 21:24होमपेज › Satara › सातार्‍यात हमालाकडून हमालाचा खून

सातार्‍यात हमालाकडून हमालाचा खून

Published On: Jan 18 2018 1:41PM | Last Updated: Jan 18 2018 1:41PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील रविवार पेठेतील मंडईमध्ये मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, मूळ रा. कदम आव्हाड पो. मुद्रंळ कोळे ता.पाटण सध्या रा.सातारा) या हमालाचा डोक्यात दगड घालून  खून करण्यत आला. बुधवारी मध्यरात्री भाजी मंडईमध्ये ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री जेवण झाल्यानंतर कदम हे मंडईतील पालामध्ये झोपले होते यावेळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी केली  होती. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.