Sat, Feb 23, 2019 04:02होमपेज › Satara › बंद अपार्टमेंट पायर्‍यांवर ‘बार’

बंद अपार्टमेंट पायर्‍यांवर ‘बार’

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:50PM

बुकमार्क करा

सातारा : विठ्ठल हेंद्रे

शहर परिसरात हुल्लडबाज युवकांची टोळी मध्यरात्री अपार्टमेंटच्या पायर्‍यांवर बसून बिनदिक्कतपणे अक्षरश: ‘बार’ भरवत असून त्यांची डांगडिंग सुरु आहे. बोगदा येथील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून प्रामुख्याने महिला व युवती त्रस्त झाल्या आहेत. दरम्यान, अशाच टवाळखोरांकडून अपार्टमेंटच्या पार्कींगमधील वाहनांतील पेट्रोल चोरीही होत असून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून युवकांच्या टोळीचा सातार्‍यात धुडगूस सुरु आहे. रात्री अकरानंतर दारुच्या बाटल्या काढून चकना काढून मिटक्या मारत दारु ढोसली जात आहे. एरव्ही बोगद्यापासून पुढे कास रस्त्यावर मिटक्या मारत बसणारी  टोळकी थंडीमुळे अपार्टमेंटचा आधार घेत आहेत. सामसूम झाल्यानंतर दारु, बिअरच्या बाटल्या काढून अपार्टमेंटच्या पायर्‍यांवरच अड्डा भरवला जात आहे.
दारुच्या नशेत तर्रर्र झाल्यानंतर युवक अश्‍लील शब्द वापरुन बेभान होत आहेत. अपार्टमेंटच्या पार्कींगलगत हा धिंगाणा सुरु असल्याने पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील रहिवासी नागरिकांना सर्वाधिक त्रास होत आहे. रात्री-अपरात्री रहिवाशांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर टोळक्याकडून उलट दमदाटी करण्याचा प्रकार होत आहे. महिला, युवती या प्रकारामुळे कमालीच्या त्रस्त्र झाल्या आहेत. दरम्यान, जे नागरिक तक्रारी करतात त्यांच्या फ्लॅटसमोर दारुच्या बाटल्या टाकणे, गुटखा, मावा थुंकणे असे गैरप्रकार करत आहेत.