Wed, Sep 18, 2019 10:36होमपेज › Satara › विठ्ठल भक्‍तीचा मेळा उत्साहात पार पाडा : खा. उदयनराजे भोसले

विठ्ठल भक्‍तीचा मेळा उत्साहात पार पाडा : खा. उदयनराजे भोसले

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मसमभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची वारकरी परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विठू माऊलीला भेटण्यासाठी लाखो भविक,  वारकरी, हरिनामाचा गजर करीत पंढरीची आषाढी आणि कार्तिक वारी करीत असतात. वारीची जाज्वल्य व स्फूर्तीदायी  परंपरा निर्धोकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान द्यावे. विठ्ठल भक्‍तीचा हा मेळा मोठया उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पाडा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी  पत्रकाद्वारे केले 

आहे. आशियायी खंडातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठी उत्सवाची परंपरा लाभलेला हा वारक-यांचा महामेळा मोठया  भक्‍तीभावाने शेकडो  वर्षापासून सुरु आहे. हा भक्‍ती मेळावा मोठया उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पाडण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मसमभाव आणि  समान न्यायाच्या शिकवणीचा आदर्श आज संपूर्ण जग घेत असताना, राज्य व केंद्र शासनाने देखिल युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांनुसार, सर्वांना समान न्याय देण्याचा भावनेतून तातडीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex