Sun, Feb 17, 2019 01:18होमपेज › Satara › साताऱ्यात धुवांधार पाऊस

साताऱ्यात धुवांधार पाऊस

Published On: Apr 08 2018 5:01PM | Last Updated: Apr 08 2018 5:40PMसातारा : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपार पासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आजही पाऊस येणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता.  त्यानंतर ४.१५ च्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील पोवई नाक आणि राजवाडा परिसरात रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचले होते.

या पावसाने सातरकरांना दिलासा दिला. मात्र या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, साताऱ्याबरोबरच मेढा, पाचगणी येथेही पावसाच्या सरी कोसळल्या.