Sun, Sep 23, 2018 00:12होमपेज › Satara › सातारा एसीबीचा सांगली पोलिसावर 'ट्रॅप'

सातारा एसीबीचा सांगली पोलिसावर 'ट्रॅप'

Published On: Jul 30 2018 2:59PM | Last Updated: Jul 30 2018 2:59PMसातारा : प्रतिनिधी

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सांगली पोलिस दलातील अस्लउद्दीन पिरजादे याला १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. दरम्यान, सातारा एसीबीने सांगलीत कारवाई  केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सांगली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात असलद्दीन पिरजादे काम करत आहे. त्याने एका वाळू व्यावसायिकाकडे वाळू ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची मागणी झाल्याने वाळूव्यवसायिकाने यांनी सातारा एसीबीकडे तक्रार दिली. पडताळणीमध्ये पिरजादे याने १० हजार रुपयांची लाच मागितली मात्र त्याने लाचेची रक्कम स्वीकारलेली नाही. 

अखेर सोमवारी सातारा एसीबीच्या पो. नि. आरिफा मुल्ला यांच्या पथकाने पिरजादे याला अटक करून त्याच्याविरुद्ध सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.